Ahilyanagar | डायल 112 सेवेच्या तत्परतेमुळे वाचला एका महिलेचा जीव; कोतवाली पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक

0

Ahilyanagar | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायल 112 सेवेच्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असलेल्या पोलीस यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

महिलेची अचानक प्रकृती बिघडली (Ahilyanagar)

अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौक परिसरात एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली. त्या वेळी मदतीसाठी कोणीही नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत संबंधित महिलेने तातडीने डायल 112 वर संपर्क साधला. कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षाने त्वरित कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.

अवश्य वाचा- साखरपुड्यातील १७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशातून मुद्देमाल हस्तगत

महिलेची प्रकृती स्थिर (Ahilyanagar)

पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. उन्हाळ्याचे दिवस आणि भर दुपारची वेळ आणि संबंधित मनीषा राहुल शिंदे या महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ तिला 108 ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे महिलेची प्रकृती स्थिर झाली आणि तिचा जीव वाचला.

हे पहा – सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक ठरेल गेमचेंजर…

विशेष म्हणजे, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच तिच्याजवळील इतर मौल्यवान वस्तूही आणि मोटार सायकल पोलिसांनी पूर्ण सुरक्षिततेने जपल्या. उपचारादरम्यान कोणतीही वस्तू हरवू नये याची काळजी घेत त्या वस्तू नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अंमलदार याकुब सय्यद, पोपट खराडे, राजेंद्र केकान यांच्या पथकाने केली आहे. या घटनेमुळे डायल 112 सेवा ही केवळ आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था नसून नागरिकांसाठी विश्वासाचे आणि आधाराचे माध्यम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. कोतवाली पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here