
Bhingar Police : नगर : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Police) तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो आणि हारजितीच्या जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत एकूण सहा लाख ३५ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस ठाण्यात (MIDC and Topkhana Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : श्रीगोंदा नगरपरिषदेत ‘पक्षीय’ बैठकीसाठी ‘शासकीय’ सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग
बिंगो जुगार सुरू असल्याचे निदर्शनास
शहरातील विविध भागात बिंगो व जुगार सुरू असल्याची माहिती अधीक्षक सुदर्शन यांना मिळाल्यानंतर त्यांनी भिंगारचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांना कारवाईचे आदेश दिली. त्यानुसार उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे व योगेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकले. पहिली कारवाई आंबेडकर चौक, गांधीनगर-बोल्हेगाव येथे करण्यात आली. येथे पोलिसांनी दोघांना पकडले. एक लाख २१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसरी कारवाई शेंडी बायपास परिसरातील दूध डेअरी चौकाजवळ, हॉटेल मातोश्री शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. येथे बिंगो जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी नऊ जणांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाख ३६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेंडी बायपास परिसरातून पाच जण ताब्यात (Bhingar Police)
शेंडी बायपास परिसरातील हॉटेल शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी पाच जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ४९ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवनागापूर, दूध डेअरी चौक परिसरातही पोलिसांनी छापा टाकला. येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले व एक लाख २८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अंमलदार निसार शेख, रवींद्र टकले, दीपक शिंदे, नंदकुमार पठारे, प्रमोद लहारे, इस्त्राईल पठाण, रामनाथ डोळे, कैलास शिरसाठ आणि पोपट देव्हारे यांच्या पथकाने केली आहे.


