Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा नगरपरिषदेत ‘पक्षीय’ बैठकीसाठी ‘शासकीय’ सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग

शासकीय मालमत्तेचा राजकीय कारणांसाठी वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू

0
Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा नगरपरिषदेत 'पक्षीय' बैठकीसाठी 'शासकीय' सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग
Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा नगरपरिषदेत 'पक्षीय' बैठकीसाठी 'शासकीय' सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग

Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा : नगरपरिषदेच्या (Shrigonda Municipal Council) श्रीमंत महादजी शिंदे प्रशासकीय इमारतीत आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांच्या अध्यक्षतेखाली भाजप (BJP) नगरसेवकांची आढावा बैठक पार पडली. मात्र, ही बैठक आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारी सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरपरिषदेचा एकही जबाबदार अधिकारी किंवा विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित नसल्याने, ही बैठक प्रशासकीय होती की केवळ भाजपची पक्षीय? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नक्की वाचा : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार

Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा नगरपरिषदेत 'पक्षीय' बैठकीसाठी 'शासकीय' सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग
Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा नगरपरिषदेत ‘पक्षीय’ बैठकीसाठी ‘शासकीय’ सभागृहाचा वापर; पाचपुतेंच्या बैठकीवरून राजकीय वादंग

आमदारांच्या बंधूंची उपस्थिती ही चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू

आमदार विक्रम पाचपुते यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही शासकीय आढावा बैठकीला मुख्याधिकारी किंवा संबंधित विभागाचे अभियंता उपस्थित राहणे अनिवार्य असते. या बैठकीला प्रशासकीय यंत्रणेने पूर्णपणे पाठ फिरवली होती. दुसरीकडे, या बैठकीत आमदारांच्या बंधूंची असलेली उपस्थिती ही चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरली आहे. कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना प्रशासकीय इमारतीतील बैठकीत त्यांचा सहभाग कशासाठी? असा सवाल आता विचारला जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विरोधी गटाची जोरदार टीका (Shrigonda Municipal Council)

या प्रकरणावर श्रीगोंद्यातील विरोधी गटाने जोरदार टीका करत “नगरपरिषदेचे सभागृह हे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे, भाजपच्या अंतर्गत पक्षीय नियोजनासाठी नाही. पक्षाची बैठक घ्यायची होती तर ती पक्ष कार्यालयात घ्यायला हवी होती. “पाचपुते यांनी घेतलेली बैठक ही आढावा बैठक असताना “अधिकार्‍यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले की त्यांनी स्वतःहून येणे टाळले? जर आमदार शहराच्या विकासावर बोलत होते, तर तिथे अधिकारी का नव्हते? ही केवळ औपचारिकता असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.”

शासकीय कामकाजात खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप हे लोकशाहीसाठी घातक

“शासकीय कामकाजात नातेवाईकांचा किंवा खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप वाढणे हे लोकशाहीसाठी घातक आहे.” नगरपरिषदेच्या सभागृहात बैठक होत असताना आणि स्वतः आमदार उपस्थित असताना प्रशासनाचा एकही प्रतिनिधी हजर का नव्हता, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. यामुळे ही बैठक अनधिकृत होती की काय, अशी शंकाही नागरिक उपस्थित करत आहेत.विरोधी गटाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून, शासकीय मालमत्तेचा राजकीय कारणांसाठी वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे.

विरोधकांच्या आरोपांना बळ

यामुळे येणाऱ्या दिवसांत श्रीगोंद्याचे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. जर शासकीय आढावा बैठक असेल तर प्रोटोकॉलनुसार शासकीय अधिकारी उपस्थित राहून या शासकीय इमारतीत होणाऱ्या बैठकीचे इतिवृत्त होणे गरजेचे असते, जे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शक्य नाही.आमदारांच्या अधिकृत पेजवरून ही पोस्ट प्रसिद्ध झाली असली, तरी त्यात केवळ राजकीय नेत्यांचेच फोटो असल्याने विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत आहे.आगामी काळात श्रीगोंद्याचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.