Accidents : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार

Accidents : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार

0
Accidents : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार
Accidents : सोलापूर महामार्गावर वाहन पलटी, तरुण वकिलासह दोन ठार

Accidents : जामखेड : नगर-सोलापूर महामार्गावरील (Nagar-Solapur Highway) रुईछत्तीशी जवळील अंबिलवाडी येथील हायवेवर चारचाकी वाहन पलटी होऊन जामखेडच्या दोघांचा जागीच मृत्यू (Died on the Spot) झाला, तर एक जखमी झाला. हा अपघात (Accidents) सोमवारी पहाटे झाला. अपघातात झालेल्या तरुणांच्या मृत्यूमुळे जायभाय व डुचे या कुटुंबांसह जामखेड शहरावर शोककळा पसरली.

नक्की वाचा: कोयत्याचा धाक दाखवत दोघांना लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

भावाच्या विवाहासाठी आले होते जामखेडला

ॲड. विराज भगवान जायभाय (वय २४, रा. शिक्षक कॉलनी), ऋषिकेश (सोनू) बाळासाहेब डुचे (वय २३, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सौरभ शिवाजी घिगे (वय २३, रा. घिगेवाडी, यावत, ता. दौंड, जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे. जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भगवान जायभाय यांचे पुत्र ॲड. विराज हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. त्यांच्या मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वळणावर अंदाज न आल्याने वाहन घुसले शेतात (Accidents)

विवाह सोहळा आटोपल्यानंतर रविवारी रात्री विराज जायभाय, ऋषिकेश (सोनू) डुचे व पुणे येथील मित्र सौरभ घिगे असे तिघेजण चारचाकी वाहनाने (क्रमांक एम. एच. १७, ए. झेड. ३२४२) अहिल्यानगर येथे जात होते. त्यांचे वाहन नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशीजवळील अंबीलवाडी येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आले. यावेळी वळणावर अंदाज न आल्याने भरधाव वाहन रस्ता सोडून शेतात घुसले. त्यानंतर वाहनाने दोन तीन पलट्या मारल्या. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये विराज जायभाय व ऋषिकेश (सोनू) डुचे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पुणे येथील मित्र सौरभ घिगे किरकोळ जखमी झाला.

अपघातात जखमी झालेला सौरभ घिगे अहिल्यानगर-सोलापूर रोडवर आला व त्याने जामखेड येथील त्यांच्या नातेवाईकांना फोनवर अपघाताची माहिती दिली. यावेळी परिसरातील लोकांनी मृत झालेल्या दोघांना बाहेर काढले. दोन्ही तरुणांच्या मृतदेहांवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी दोघांवर जामखेड येथील अमरधाम येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वकिलांनी वाहिली श्रद्धांजली

ॲड. विराज व ऋषिकेश यांना जामखेड तालुका वकील संघाने श्रद्धांजली वाहिली. तसेच दुःखात सहभागी होत एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करून निर्णय घेतला होता.