Sujay Vikhe : ‘अहिल्यानगर’चे आजी-माजी खासदार एकाच वेळी आजारी; राजकीय चर्चांना उधाण

0
Sujay Vikhe : ‘अहिल्यानगर’चे आजी-माजी खासदार एकाच वेळी आजारी; राजकीय चर्चांना उधाण
Sujay Vikhe : ‘अहिल्यानगर’चे आजी-माजी खासदार एकाच वेळी आजारी; राजकीय चर्चांना उधाण

Sujay Vikhe : नगर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात एकाच वेळी आजी-माजी खासदार आजारी पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मणक्याचा त्रास सुरू असून, डॉक्टरांनी त्यांना पुढील १५ दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात घेतले दर्शन

आजी-माजी खासदार एकाच वेळी आजारी

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोशल मीडिया फॅन पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले की, “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील १५ दिवस पूर्ण विश्रांती घेत आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम आणि भेटीगाठी रद्द करण्यात आल्या आहेत.” यापूर्वी अहिल्यानगरचे विद्यमान खासदार नीलेश लंके यांनाही प्रकृती बिघडल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही आजी-माजी खासदार एकाच वेळी आजारी पडल्याने मतदारसंघात विविध चर्चा रंगल्या आहेत.

नक्की पहा : वायूदलाच्या चित्तथरारक कसरतींनी न्हाऊन निघाले ‘सोमनाथ’चे आकाश!

कार्यकर्ते आणि समर्थक चिंतेत (Sujay Vikhe)

डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते मानले जातात. त्यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थक चिंतेत आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, विश्रांती काळात फक्त अत्यावश्यक बाबतीतच संपर्क साधला जाईल. उर्वरित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.