Aircraft Crash : नगर : बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान खाली पडल्याची दुर्घटना घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; तीन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अचानक तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमकं विमान कशामुळे कोसळलं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि संबंधित यंत्रणा तातडीने दाखल झाल्या.
परिसरात भीतीचं वातावरण
नक्की पहा : घोड्यावरुन थेट पुणे महापालिकेत… वसंत मोरे यांचं अनोखं आंदोलन
परिसरात भीतीचं वातावरण (Aircraft Crash)
विमान कोसळल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनाग्रस्त विमान शेतजमिनीत पडल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, याच गोजुबाबी गावाच्या परिसरात यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच परिसरात विमान दुर्घटना घडल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला असून अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे



