Gold chain stolen : पाथर्डी : पाथर्डी शहरातील नवीन बसस्थानक (Pathardi Bus Stand) परिसरात गर्दीचा फायदा घेत वृद्ध प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून (Gold chain stolen) नेल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) तीन अज्ञात इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या महंतांबद्दलचे शब्दप्रयोग निषेधार्ह : डॉ राधाकृष्ण विखे पाटील
सुमारे १० ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून नेली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहन शंकर खंडागळे (वय ७५, रा. जावसईगाव, अंबरनाथ, जि. ठाणे) हे आपल्या मुलासह पाथर्डी येथील नवीन बसस्थानकात आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते पाथर्डी-उल्हासनगर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Gold chain stolen)
घटना लक्षात येताच खंडागळे यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



