Tofkhana Police Station : नगर : शहरातील सावेडी परिसरात पोस्ट ऑफिसजवळ झालेल्या वादातून शिवीगाळ करून दगडफेक करत वाहनाची तोडफोड (Vandalism of Vehicles) केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) एका व्यक्तीविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१२) घडली.
नक्की वाचा: हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या महंतांबद्दलचे शब्दप्रयोग निषेधार्ह : डॉ राधाकृष्ण विखे पाटील
सावेडी पोस्ट ऑफिस परिसरातील घडना
याबाबत केशव भाऊसाहेब काळे (रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) यांनी तक्रार दिली आहे. आफरीम हमीद शेख (वय ४०, रा. केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकार सावेडी पोस्ट ऑफिस परिसरात घडला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, तक्रारदार काही कामानिमित्त सावेडी पोस्ट ऑफिस येथे गेले होते. त्यावेळी रांगेत उभे असताना संशयिताने त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ (Tofkhana Police Station)
तसेच दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी रांगेत उभे असताना संशयिताने त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली.



