Akole : नगर : पिंपळदरावाडी (ता. अकोले) येथील साठवण तलाव कामाच्या खोदकामात निघालेले दगड, मुरूम ही सर्व गौणखनिज नियमाप्रमाणे साठा करणे बंधनकारक होते. परंतु संबंधित ठेकेदाराने गौणखनिज उत्खनन केल्यानंतर त्याची परस्पर विक्री केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नक्की पहा : उशिरा मातृत्वाचा विचार करत असाल तर ‘ही’ तपासणी नक्की करा
परवानग्या न घेता विक्री
पिंपळदरावाडी येथील साठवण तलाव कामाचे खोदकामात निघालेले दगड, मुरूम ही सर्व गौणखनिज परस्पर विल्हेवाट लावली आहे. संबंधित ठेकेदाराने नियमाप्रमाणे जलसंधारण विभागाच्या परवानगीने केल्या जाणाऱ्या खोदकामाची माहिती महसूल विभागाला कळविणे अपेक्षित होते. सदरचा गौणखनिज साठवण्यासाठी किंवा महसूल विभागाच्या आदेशाने पुढील कार्यवाही होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. गौणखनिज हे परस्पर कुठल्याही परवानग्या न घेता विक्री करण्यात आले आहे. असा आरोप दराडे यांनी केला आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावीसाठी १ लाख जागा; उद्या लागणार तात्पुरती प्रवेश गुणवत्ता यादी
सखोल चौकशीची मागणी (Akole)
बाजारभावाप्रमाणे शासकीय मूल्य व स्वामित्व धन याची एकूण किंमत व नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी शासनाकडे केली होती. याबाबतचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर राज्याचे गृह, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना बाजीराव दराडे यांनी दिले आहे. त्यावर मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



