Admission : अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावीसाठी १ लाख जागा; उद्या लागणार तात्पुरती प्रवेश गुणवत्ता यादी

0
Admission : अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावीसाठी १ लाख जागा; उद्या लागणार तात्पुरती प्रवेश गुणवत्ता यादी
Admission : अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावीसाठी १ लाख जागा; उद्या लागणार तात्पुरती प्रवेश गुणवत्ता यादी

Admission : नगर : मागील वर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. जिल्ह्यात यंदा ६३ हजार ४ विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी ९९ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत. म्हणजे ३६ हजार ७९६ जागा अतिरिक्त आहेत. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा : पाणी प्रश्नांसह स्वच्छतेच्या मुद्द्यांवर पाथर्डी नगरपरिषदेत जोरदार चर्चा 

६३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण

चालू वर्षी दहावीसाठी जिल्ह्यातून एकूण ६७ हजार ९७० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३४ हजार ३ विद्यार्थी व २९ हजार १ विद्यार्थिनी, असे ६३ हजार ४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. दुसरीकडे यंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ८६ हजार २९६ जागा उपलब्ध आहेत.

नक्की पहा : उशिरा मातृत्वाचा विचार करत असाल तर ‘ही’ तपासणी नक्की करा

सर्वांना प्रवेश मिळणार (Admission)

या जागांपैकी सुमारे ४९ हजार ७७० जागा विज्ञान शाखेसाठी आहेत. ३२ हजार ४८० हजार जागा कला शाखेसाठी, तर १६ हजार ३४० हजार जागा वाणिज्य शाखेसाठी आहेत. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्यांच्या संख्याही ६३ हजार आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे अकरावीऐवजी तंत्रनिकेतन, आयटीआय किंवा अन्य व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेत असतात. यामुळे अकरावी प्रवेशासाठीच्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. जिल्ह्यात ११ वीसाठी असणाऱ्या जागा आणि दहावी उत्तीर्ण यांची तुलना केल्यास ३६ हजारांहून अधिक जागा अतिरिक्त ठरतात. यामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठीची चिंता पालकांना राहणार नाही.