Pathardi Municipal Council: पाणी प्रश्नांसह स्वच्छतेच्या मुद्द्यांवर पाथर्डी नगरपरिषदेत जोरदार चर्चा 

डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका

0

Pathardi Municipal Council: पाथर्डी: नगरपरिषदेत (Pathardi Municipal Council) पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाथनगर परिसरातील पाणीपुरवठा, शहरातील वाढता डासांचा प्रादुर्भाव, जुना बसस्टँड येथील महिलांच्या स्वच्छतागृहाची गैरसोय तसेच पावसाळ्यापूर्वी गटारे व नाले साफ करण्याच्या मागण्यांवर नगरसेविका किरण प्रतिक खेडकर यांनी ठाम भूमिका मांडली. प्रभाग क्रमांक सहामधील नाथनगर परिसरात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सभेत निदर्शनास आणून देण्यात आले. पाणीपुरवठा नियमित, सुरळीत व ठरलेल्या वेळेत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

अवश्य वाचा- अशोक खरात विरोधात १७ गुन्हे; लवकरच सर्व प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होणार

डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका (Pathardi Municipal Council)

शहरात वाढत असलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून फॉगिंग, गटार स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.जुना बसस्टँड परिसरातील महिलांच्या स्वच्छतागृहाची गंभीर गैरसोय आणि परिसरातील अस्वच्छतेचाही मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून नियमित साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.पावसाळा तोंडावर असताना शहरातील गटारे व नाले तातडीने साफ करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. विशेषतः शेवगाव रोडवरील नाला तातडीने साफ न केल्यास कोरडगाव रोड परिसरात पाणी साचून नाथनगरमधील घरांमध्ये घाण पाणी शिरण्याची शक्यता असल्याचे नगरसेविका खेडकर यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या सर्व विषयांवर नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे तसेच मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सकारात्मक आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक नंदकुमार शेळके व सुभाष बोरुडे उपस्थित होते.जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून विकास, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. आपलं शहर, आपला प्रभाग आणि आपली जबाबदारी या भावनेतून काम सुरू आहे असे प्रतिपादन नगरसेविका किरण खेडकर व जगदंब युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिक खेडकर यांनी केले.