Fadanvis : पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
Fadanvis : पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Fadanvis : पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Fadanvis : नगर : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले. खुद्द पंतप्रधान मोदींनीही आपल्या वाहनांच्या ताफ्यात लक्षणीय कपात केली आहे. यानंतर आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गाड्यांचा ताफा बाजूला सारून दुचाकीवरून विधानभवनात पोहोचले. दरम्यान, पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात फार मोठ-मोठे कार्यक्रम सरकारकडून आयोजित केले जाणार नाहीत,” अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावीसाठी १ लाख जागा; उद्या लागणार तात्पुरती प्रवेश गुणवत्ता यादी

मुख्यमंत्री म्हणाले

फडणवीस म्हणाले, “मी आज बाईकने जो काही प्रवास करत आहे. पंतप्रधानांचा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी एक प्रयत्न म्हणून हे करत आहे. खरे तर आम्ही आमचा तफाही छोटा केला आहे. तो आणखी छोटा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही सर्वांचे परदेश दौरेही रद्द केले आहेत. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी विदेशी पुद्रा अथवा परकीय चलन, प्रेट्रोल डिझेल वाचवू शकतो, ते वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू.”

नक्की पहा : कलाशिक्षक प्रमोद उबाळे यांनी खडूवर साकारले छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प

उद्या साताऱ्यात कार्यक्रम (Fadanvis)

फडणवीस पुढे म्हणाले, “पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात फार मोठ-मोठे कार्यक्रम सरकारकडून आयोजित केले जाणार नाहीत. केवळ उद्याच, आम्ही साताऱ्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जो प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे. आणि १० हजार थेट आपल्या लोकांच्या खात्यात जाणार आहेत. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नाही.” मात्र उद्यानंतर, आम्ही कुठलेही मोठे कार्यक्रम करणार नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.