Accident : नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा साखळी अपघात; एसटी, कंटेनर व कारच्या धडकेत ३० ते ३५ जण जखमी

आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच भीषण अपघातात बदलला

0
Accident : नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा साखळी अपघात; एसटी, कंटेनर व कारच्या धडकेत ३० ते ३५ जण जखमी
Accident : नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा साखळी अपघात; एसटी, कंटेनर व कारच्या धडकेत ३० ते ३५ जण जखमी

Accident : पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील (Nagar-Pune Highway) पळवे शिवार गुरुवारी (ता. १४) चार वाहनांच्या साखळी अपघाताने (Accident) हादरून गेले. मठ वस्तीवरील घाणेगाव रोडलगत असलेल्या हॉटेल जय मल्हारसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आळंदी येथे विवाहासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींसह सुमारे ३० ते ३५ जण जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर (Condition Critical) असल्याची माहिती मिळत असून सुप्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा : बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा : पालकमंत्री विखे पाटील

वऱ्हाडींवर कोसळला दुःखाचा डोंगर

गुरुवारी (ता. १४) विवाह मुहूर्त असल्याने नगर-पुणे महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी होती. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील राजळे परिवारातील वऱ्हाडी मंडळी लक्झरी बसमधून आळंदीकडे विवाह सोहळ्यासाठी निघाली होती. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच भीषण अपघातात बदलला आणि वऱ्हाडींवर दुःखाचा डोंगर कोसळला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जालना येथून पुण्याकडे जाणारी कार अचानक लक्झरी बसला हुल देत पुढे गेली. मागून येणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाने कारला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि लक्झरी बस थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या कंटेनरवर आदळली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा (Accident)

लक्झरी बस आणि कंटेनरमधील धडक अत्यंत भीषण होती. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. लक्झरी बस आणि कंटेनरचे चालक वाहनांमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही चालकांना बाहेर काढले. लक्झरी आणि कंटेनरच्या धडकेनंतर महामार्गावर अचानक वाहने थांबली. त्याचवेळी कंटेनरच्या मागून नगरकडे येणारी एसटी बसही वेगात येऊन कंटेनरला धडकली. या अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेली स्विफ्ट डिझायर कार मात्र, रस्त्यालगतच्या शेतामध्ये जाऊन थांबली.