
Rahuri News : राहुरी : वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या (Vaishnavi Chowk Youth Foundation) वतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील विविध शाळेतील इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा (students) सन्मान करण्यात आला.
नक्की वाचा : फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात कुत्तरवाडी ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा; कारवाईची मागणी
गुणवंत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देवळाली प्रवरा न्यू इंग्लिश स्कूल, वाणी सेंट्रल स्कूल,डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूल,छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी फॅक्टरी आदी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नगराध्यक्ष सत्यजित कदम, संदीप येवले व प्रीती कदम या मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नगरसेवक वसंत कदम यांनी केले
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मान्यवरांची उपस्थिती (Rahuri News)
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुजित लोंढे,उपाध्यक्ष नितीन मोरे,अमोल कदम,महेंद्र दोंड,संतोष कदम,जालिंदर दोंड,मनोज गावडे,संजय धुमाळ,मयुर मोरे,सुजित सिणारे,बाबासाहेब खांदे,प्रसाद कदम व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते. वैष्णवी चौक परिसरातील योगभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत इंडस्ट्री ऑफीसर म्हणून निवड झालेले संदीप येवले, प्रीती कदम, नगरसेवक राजेंद्र लोखंडे, नगरसेविका चंदारानी गाडे, नगरसेवक वसंत कदम, वैभव गाडे, शरद खांदे आदी मान्यवर उपस्थित होते


