Hardik Pandya : हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार; सत्य नेमकं काय?

0
Hardik Pandya : हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार; सत्य नेमकं काय?
Hardik Pandya : हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार; सत्य नेमकं काय?

नगर : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यातच दुखापतीमुळे हार्दिक मागील दोन सामने खेळू शकला नाही. मात्र आता हार्दिक त्याच्या लग्नाच्या चर्चांमुळे (Wedding Discussions) प्रसिद्धी झोतात आला आहे.

नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या तयारीत; नेमकं कारण काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक २२ मे रोजी उदयपूर येथे मॉडेल आणि इन्फ्लुएंसर माहिका शर्मा हिच्यासोबत खासगी समारंभात विवाह करणार आहे. गेल्या वर्षभरापासून हार्दिक आणि माहिका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ती अनेकदा भारताच्या तसेच मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसली होती. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

अवश्य वाचा: आता वाहनधारकांची खैर नाही! ‘ही’ गोष्ट न केल्यास थेट हजार रुपये दंड, परिवहन मंत्र्यांचा इशारा

हार्दिकच लग्न होणार का? (Hardik Pandya)

सोशल मीडियावर हार्दिक आणि माहिका यांच्या लग्नाच्या बातम्या जोरात व्हायरल होत आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अनेक रिपोर्ट्सनुसार, हे दावे सध्या तरी अप्रमाणित असून त्याला ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे २२ मे रोजी लग्न होणार असल्याची चर्चा कितपत खरी आहे, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

२० मे रोजी हार्दिक मैदानात पुनरागमन करणार? (Hardik Pandya)

मुंबई इंडियन्सला IPL मध्ये अजून दोन सामने खेळायचे आहेत. त्यातील एक सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २० मे रोजी ईडन गार्डन्स येथे होणार आहे. या सामन्यात हार्दिक दुखापतीतून सावरून पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.