Godavari Right Bank Canal : चालू आवर्तनाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; पाणी मागणी अर्ज भरून घेण्याची मागणी

जलसंपदा विभागाने कुठलेही निकष न लावता सात क्रमांकाचे अर्ज भरून घ्यावेत

0
Godavari Right Bank Canal : चालू आवर्तनाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; पाणी मागणी अर्ज भरून घेण्याची मागणी
Godavari Right Bank Canal : चालू आवर्तनाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; पाणी मागणी अर्ज भरून घेण्याची मागणी

Godavari Right Bank Canal : राहाता : गोदावरी उजव्या कालव्यावर (Godavari Right Bank Canal) उन्हाळी आवर्तनासाठी कमी पाण्याची मागणी आली. परंतू आता तापमान (Temperature) ४५ अंशापर्यंत गेल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा चालू आवर्तनाकडे लागल्या आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाने (Water Resources Department) उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सात क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज खास बाब म्हणून भरून घ्यावेत व या शेतकऱ्यांना चालू आवर्तनातून पाणी द्यावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक ॲड. नारायण कार्ले यांनी केली.

नक्की वाचा : ८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी; जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक

उभी पिके सापडली संकटात

ॲड. कार्ले म्हणाले, गोदावरी उजव्या कालव्याचे सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. काही वितरकांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज दाखल करण्याचे नजरचुकीने राहून गेले आहे. यावर्षी तीव्र उन्हाळा आहे. तापमान ४५ अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे उभी पिके संकटात सापडली आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही वितरिकांचे पाणी बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा (Godavari Right Bank Canal)

विशेष करून पेरूच्या बागेवर छोट्या छोट्या कळ्या लागल्या आहेत. आता मात्र या पेरू बागांना पाणी न मिळाल्यास या कळ्या गळून पडतील परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच इतर उभ्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. जलसंपदा विभागाने कुठलेही निकष न लावता सात क्रमांकाचे अर्ज भरून घ्यावेत. या शेतकऱ्यांना चालू आवर्तनातून फळबागा व इतर पिकांना पाणी द्यावे. या बाबत आपण संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकारने व जलसंपदा विभागाने काळजी घ्यावी.

धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध

पिके व फळबागांना या उन्हाळी आवर्तनाचे पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात ,समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाणी दिल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना पाणी हवे असेल, त्यांच्याकडून पाणी पट्टी भरून घेऊन पाणी द्यावे. तरी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना चालू आवर्तनातून पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी अॅड. कार्ले यांनी केली