Negligence in Election Duties : निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा; कर्मचारी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Negligence in Election Duties : निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा; कर्मचारी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Negligence in Election Duties : निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा; कर्मचारी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Negligence in Election Duties : निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा; कर्मचारी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Negligence in Election Duties : नगर : मतदार यादी अद्ययावतीकरण (Voter List Updating) व मतदार मॅपिंगच्या महत्त्वाच्या निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा (Negligence in Election Duties) केल्याचा आरोप करत अहिल्यानगर महापालिकेतील एका कर्मचार्‍याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र बबन फुलारी (रा. नय्यर शाळेसमोर, नामदेव चौक, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निवडणूक कामात विलंब व टाळाटाळ

यासंदर्भात सुनील बाजीराव नेटके (वय ४३, रा. शेंडी, ता. अहिल्यानगर) यांनी रविवारी (ता.१७ मे) फिर्याद दिली आहे. ते पेमराज सारडा कॉलेजमध्ये ग्रंथालय लिपीक म्हणून कार्यरत असून सध्या २२५ अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली १० बीएलओ कार्यरत असून निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे व मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर सावेडी परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी क्रमांक २३ म्हणून कार्यरत असलेले मनपा कर्मचारी राजेंद्र फुलारी यांच्यावर निवडणूक विषयक कामात विलंब, टाळाटाळ, दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोणतेही काम पूर्ण न केल्याचा आरोप (Negligence in Election Duties)

संबंधित कर्मचार्‍याची सन २०२३ पासून बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम सोपविण्यात आले होते. फिर्यादीनुसार, फुलारी यांनी १६ एप्रिल २०२६ पासून निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ केली. त्यांना वेळोवेळी बैठका घेऊन तसेच लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. ११ मे २०२६ रोजी कामावर हजर राहून कामात सुधारणा करण्याबाबत लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही संबंधितांनी मतदार मॅपिंगचे कोणतेही काम पूर्ण केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाच्या कामाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांच्या लेखी आदेशानुसार ही फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.