Kotwali Police Station : १७ वर्षीय अपहृत अल्पवीन मुलीची सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधमोहीम राबवून अखेर आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात यश

0
Kotwali Police Station : १७ वर्षीय अपहृत अल्पवीन मुलीची सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी
Kotwali Police Station : १७ वर्षीय अपहृत अल्पवीन मुलीची सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kotwali Police Station : नगर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीतून अपहरण झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी (Accused) प्रदीप उर्फ व्हन्या परशुराम इजगत (रा. रेल्वे स्टेशन, बोहरी चाळ, अहिल्यानगर) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत करण्यात आली.

नक्की वाचा : माहीजळगाव शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई

गुन्हा दाखल

याबाबत माहिती अशी की, १८ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास संशयित आरोपी प्रदीप इजगत याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी व मुलगी दोघांचाही शोध घेतला जात होता. दरम्यान, दोघेही पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी ही माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांना देत तातडीने पथक रवाना केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात यश (Kotwali Police Station)

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद आणि अमोल गाडे यांच्या पथकाने वानवडी पोलिसांच्या मदतीने बारकाईने तपास सुरू केला. सलग ३६ तास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधमोहीम राबवून अखेर आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात यश आले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि आरोपीस अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, अमोल गाडे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू व नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.