Karjat Police : माहीजळगाव शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई

एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0
Karjat Police : माहीजळगाव शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई
Karjat Police : माहीजळगाव शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई

Karjat Police : कर्जत : माहीजळगाव (Mahijalgaon) (ता.कर्जत) शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक मुद्देमालासह कर्जत पोलिसांनी (Karjat Police) जेरबंद केला. नागेश महेंद्र पावरा (वय २१, बुडकी- बुराडी ता. शिरपूर, जिल्हा धुळे) असे अटक (Arrest) केलेल्या युवकाचे नाव आहे. 

नक्की वाचा : शेडगाव येथील जबरी चोरीचा अवघ्या ६ तासांत छडा; मुख्य आरोपीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात

एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, (ता. १७) रोजी कर्जत पोलीस उपविभागाचे पथक गस्त करीत असताना पोलीस कर्मचारी अमोल भैलुमे यांना चापडगाव ते माहीजळगाव हायवे रोडलगत कर्जत फाटा येथे एक युवक उभा असून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती भैलुमे यांनी तत्काळ पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांना दिली. प्राप्त माहितीची शहानिशा करून त्याची चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या पाठीवरील बॅगेत कर्जत पोलिसांना ३० हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्टल, २ हजार रुपये किमतीचे मॅग्झिन, २ जिवंत काडतूस असे एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या इसमाविरुद्ध धुळेसह इतरत्र गुन्हे दाखल (Karjat Police)

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव नागेश महेंद्र पावरा  सांगितले. झडतीमध्ये मिळून आलेले गावठी कट्टे त्याने विक्री करीता आणले असल्याचे पोलिसांकडे कबुल केले. या इसमाविरुद्ध धुळेसह इतरत्र गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस हवालदार अमोल भैलुमे, सागर जंगम, प्रताप देवकाते, मच्छिंद्र जाधव, प्रकाश दंदाडे यांनी केली.