Art Exhibition : नगर : ‘सृजन फाउंडेशन’ प्रस्तुत ‘आदर्शांच्या शोधात…’ या विशेष उपक्रमांतर्गत ज्येष्ठ चित्रकार, कलाशिक्षक आणि कलासंशोधक कै. र.बा. केळकर यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त भव्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महान कलाकार आणि शिक्षक यांच्या हक्कप्राप्त चरित्रासह दुर्मीळ चित्रे, रेखाचित्रे, पत्रे आणि माहितीपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा : ‘कॉकरोच जनता पार्टी’वर फॉलोवर्सचा पाऊस; सोशलमिडीयावर भाजपलाही टाकले मागे
कलारसिकांसाठी पर्वणी
या विशेष प्रदर्शनात प्रसिद्ध कलाकार आर.बी. केळकर (१९०८-२००४), क्लाइव्ह ब्रॅन्सन (१९०७-१९९४) आणि एस.एच. रझा (१९२२-२०१६) यांच्या कलाकृती व कलाप्रवासाचे दर्शन घडणार आहे. कला, संस्कृती, तसेच गुरु शिष्य परंपरा यांचा संगम घडवणारे हे प्रदर्शन कलारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे प्रदर्शन ता. २२ ते २४ मे २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले असून, ठिकाण म्हणून टिळक हॉल, जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहिल्यानगर येथे व्यवस्था करण्यात आली.
नक्की पहा : ‘हे’ 4 युवा खेळाडू ठरणार टीम इंडियाचे भविष्य?
आयोजकांचे आवाहन (Art Exhibition)
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कवी, लेखक व ‘रझा फाउंडेशन’ विश्वस्त अशोक वाजपेयी, ‘रचना संसद’ मुंबईचे प्राचार्य महेंद्र दामले, र.बा. केळकर यांचे सुपुत्र प्रकाश केळकर तसेच क्लाइव्ह ब्रॅन्सन यांच्या सुपुत्री चित्रकार रोझा ब्रॅन्सन लंडन येथून उपस्थित राहणार आहेत. कला, इतिहास आणि आदर्शांच्या शोधात असा अद्वितीय संगम अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार असून, कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.



