Cockroach Janata Party : नगर : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित ‘कॉकरोच’ वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 5 दिवसांत या पेजने सोशल मीडियावर कोट्यवधींचा टप्पा पार करत अनेक मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत इन्स्टाग्रामवर या पेजचे 1.2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले होते, तर ट्विटरवरही लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर शहरातील नागापूर-बोल्हेगाव येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण
फॉलोवर्सचा पाऊस
विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर भाजपचे सुमारे 87 लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे 1.32 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची वाढ सोशल मीडियावर चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. या मोहिमेची सुरुवात अभिजीत दीपके यांनी केली आहे. ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी’ असे हटके घोषवाक्य घेऊन त्यांनी या पेजची निर्मिती केली. सुरूवातीच्या काही तासांतच लाखो तरुणांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आणि एका दिवसातच 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स वाढल्याचा दावा करण्यात आला.
नक्की पहा : आरटीओ कॅम्पला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट
जाहीरनामा प्रसिद्ध (Cockroach Janata Party)
‘कॉकरोच जनता पार्टी’ने स्वतःचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. पक्ष सदस्यत्वासाठी बेरोजगारी, आळस, सतत ऑनलाइन राहण्याची सवय आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता अशा चार अटी ठेवण्यात आल्या आहेत. अभिजीत दीपके सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी याआधी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये सद्स्य म्हणून काम केले होते. सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या तरुणांच्या भावना पाहूनच ‘CJP’ची कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले.



