
नगर : शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील नागापूर-बोल्हेगाव येथील व्यंकटेश कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे (Road Concretization) काम पूर्ण झाले असून, माजी नगरसेवक अशोकराव बडे (Ashokrao Bade) आणि नगरसेवक बाबूशेठ (आप्पा) नागरगोजे (Babusheth Nagargoje) यांनी महापालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळला आहे.
नक्की वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

बंधित विभागाकडे तत्काळ पाठपुरावा
व्यंकटेश कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. या त्रासाला कंटाळून परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या समस्येबाबत माजी नगरसेवक अशोकराव बडे व नगरसेवक बाबूशेठ (आप्पा) नागरगोजे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी या समस्येची गंभीर दखल घेत संबंधित विभागाकडे तत्काळ पाठपुरावा सुरू केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार (Road Concretization)
अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे व्यंकटेश कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवक अशोकराव बडे आणि नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे यांचे आभार मानले आहेत.


