Shirdi : शिर्डीमध्ये संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन; विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी

0
Shirdi : शिर्डीमध्ये संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन; विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी
Shirdi : शिर्डीमध्ये संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन; विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी

Shirdi : राहाता : शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरीकांसाठी संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.

हेही वाचा : जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो तरुणांची फसवणूक; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. अहिल्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे अहील्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल.या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे.

नक्की पहा : एग फ्रीजिंगचा ट्रेंड का वाढतोय?

विशेष संरक्षण प्रदर्शन (Shirdi)

उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.यासाठी मोठे स्टाॅल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विज्ञानप्रेमी, नागरिक, महीला या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.