Kotwali Police Station : अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात व्यावसायिक जखमी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kotwali Police Station : अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात व्यावसायिक जखमी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Kotwali Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्ता परिसरात गुरूवारी (ता.२१) पहाटेच्या सुमारास एका फर्निचर व्यावसायिकावर अज्ञात इसमाने अचानक हल्ला करून जखमी (Attacked and Injured) केल्याची घटना घडली आहे. भरत माऊजी पित्रोडा (वय ४४, रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

डोक्यात दगड मारल्याने जखमी

फिर्यादी भरत पित्रोडा यांचे आगरकरमळा परिसरात फर्निचर दुकान आहे. ते गुरूवारी पहाटे पुणे बसस्थानक परिसरात गेले होते. तेथून परत घरी जात असताना मल्हार चौक, स्टेशन रस्ता येथे एका अज्ञात व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबवले. त्यानंतर झालेल्या वादातून त्या व्यक्तीने फिर्यादीला चापट मारली तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर संबंधित व्यक्तीने रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात मारल्याने ते जखमी झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जखमी अवस्थेत गाठले पोलीस ठाणे (Kotwali Police Station)

हल्ल्यानंतर संबंधित व्यक्तीने धमकी देत तुला काय करायचे ते कर, पोलिसांकडे जा असे म्हणत घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पित्रोडा यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठवले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.