Local Crime Branch : संगमनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : संगमनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

Local Crime Branch : नगर : संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

संशयित आरोपीचे नावे

शुभम संजय जेडगुले (वय-२५, रा. वेल्हाळे ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), शरद कारभारी गुंजाळ (रा.खांडगाव ता.संगमनेर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सापळा रचून संशयित आरोपींना घेतले ताब्यात (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोडवर जाणाऱ्या सर्विस रोडने आडगाव शिवारात येथून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, अमृत आढाव, योगेश कर्डिले, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.