Attack on Taluka Police Squad : अहिल्यानगर तालुका पोलीस पथकावर हल्ला; दोन कर्मचारी जखमी

Attack on Taluka Police Squad : अहिल्यानगर तालुका पोलीस पथकावर हल्ला; दोन कर्मचारी जखमी

0
Attack on Taluka Police Squad : अहिल्यानगर तालुका पोलीस पथकावर हल्ला; दोन कर्मचारी जखमी
Attack on Taluka Police Squad : अहिल्यानगर तालुका पोलीस पथकावर हल्ला; दोन कर्मचारी जखमी

Attack on Taluka Police Squad : नगर : अहिल्यानगर तालुका परिसरात एका तरुणाच्या अपहरण (Kidnapping of Youth) प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपींकडून अचानक हल्ला (Attack on Taluka Police Squad) करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर तर एक किरकोळ जखमी (Police Personnel Seriously Injured) झाला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा : सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद

पैसे न दिल्यास खून करण्याची दिली धमकी

याबाबत मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, सचिन विजय कार्ले (रा. दहिगाव साकत, ता. जि. अहिल्यानगर) यांनी शुक्रवारी (ता.२२) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान नगर तालुका पोलीस ठाणे येथे धाव घेत आपल्या भावाचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांचा भाऊ आकाश विजय कार्ले (वय २७) याचे गुरुवारी (ता.२१) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी राहत्या घरातून जबरदस्तीने चार चाकी वाहनातून डांबून अपहरण केले होते. अपहरणकर्ते आकाशच्या मोबाईलवरून वारंवार फोन करून कुटुंबियांकडे ९० हजार रुपयांची खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास आकाशचा खून करण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात येत होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर चढविला हल्ला (Attack on Taluka Police Squad)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर तालुका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अपहृत तरूणाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते कोल्हुबाईचे कोल्हार (ता. जि. अहिल्यानगर) परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग तसेच दोन होमगार्ड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. स्टेशन डायरीत नोंद करून संबंधित पथकाला अपहृत तरुणाच्या भावासह व मित्रांसोबत तातडीने कोल्हार येथे रवाना करण्यात आले.

दरम्यान, पोलीस पथकाने कोल्हार येथील एका हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या आकाश कार्ले याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत एमआयडीसी पोलीस, आरसीपी पथक आणि नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त मदतीने विशेष कारवाई राबविली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. जखमी भालसिंग यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.