Siddhatek : सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

भांबोरा-सिद्धटेक-दौंड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा

0
Siddhatek : सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
Siddhatek : सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

Siddhatek : कर्जत : सिद्धटेक (Siddhatek) येथील भीमानदी (Bhima River) वरील मोठ्या पुलाचा गावाकडील स्लॅब व त्या खाली असलेला भराव यांची झीज झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी १० दिवस २३ मे ते ३ जूनपर्यंत या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी दिली. त्यामुळे भाविकांनी आणि सर्वसामान्य वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना

स्लॅब आणि त्याच्या खालील असणारा भराव याची झीज

अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे गणेशभक्तांची मोठी वर्दळ असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस व शैक्षणिक सुट्टीचा कालावधी असल्याने यात पर्यटकांची मोठी वर्दळ पहावयास मिळते. नगर-पुणे जिल्ह्यास जोडणारा जवळचा मार्ग रामा ६८ म्हणून दौंड-राशीन-करमाळा-कर्जत यांना जोडणारा सिद्धटेक येथील भीमानदी वरील २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला मोठया पुलाचा सिद्धटेक गावालगतचा स्लॅब आणि त्याच्या खालील असणारा भराव याची झीज झाली असल्याचे निदर्शनास आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे आणि त्यांच्या पथकाने सदरच्या पुलाची पाहणी करीत वरिष्ठांना अहवाल सादर केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भांबोरा-सिद्धटेक-दौंड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा (Siddhatek)

या पुलाचा स्लॅब आणि त्याखालील भराव याची झीज झाली असल्याचा निष्कर्ष मिळाला असून त्यानुसार २३ मे ते ३ जून या १० दिवसांच्या या कालावधीत सिद्धटेक येथील भीमानदी वरील मोठ्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सदरचा पूल वरील कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भांबोरा-सिद्धटेक-दौंड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.