Pravara River : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना

हा सुशोभीकरण प्रकल्प अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार

0
Pravara River : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना
Pravara River : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना

Pravara River : अकोले : शहरातील प्रवरा नदीच्या (Pravara River) काठावर सुरू असलेल्या सुशोभीकरण व जॉगिंग ट्रॅकच्या (Jogging Track) कामाची आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या सोयी-सुविधा तसेच भविष्यात या प्रकल्पाचा अधिक प्रभावी उपयोग व्हावा यासाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत आवश्यक सूचना देत कामाची गुणवत्ता आणि उपायुक्तता वाढविण्यावर भर दिला.

नक्की वाचा : बनावट, भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री; कंपनी संचालकासह विक्रेत्यावर गुन्हा

Pravara River : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना
Pravara River : प्रवरा नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामाची आमदार लहामटे यांच्याकडून पाहणी; आवश्यक बदलांच्या सूचना

हा प्रकल्प अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार

दशक्रिया विधीच्या प्रसंगी नदीकाठ परिसराची पाहणी करताना काही बाबी प्रकर्षाने जाणवल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले. त्यानुसार नदीकाठावरील सुविधा अधिक सुटसुटीत व सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी ठरतील अशा पद्धतीने विकसित करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रवरा नदीच्या काठावर विकसित होत असलेला हा सुशोभीकरण प्रकल्प अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच विरंगुळ्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रवरा नदीच्या स्वच्छतेबाबत नागरिकांना आवाहन (Pravara River)

यावेळी आमदार लहामटे यांनी प्रवरा नदीच्या स्वच्छतेबाबतही नागरिकांना आवाहन केले. नदी परिसर स्वच्छ आणि सुंदर राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही व्यावसायिक व नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. “प्रवरा नदीचे पाणी शेवटी आपल्या सर्वांच्या वापरासाठी आणि पिण्यासाठीच आहे. त्यामुळे नदीपात्रात कचरा टाकणे टाळून स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने सहकार्य करावे,” असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले.