Petrol and Diesel Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ

0
Petrol and Diesel Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ
Petrol and Diesel Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ

Petrol and Diesel Price Hike: इराण आणि अमेरिका युद्धाचा (Iran and US War) थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. कारण येत्या दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ (Petrol and Diesel Price Hike) झाली आहे. याचा मोठा दणका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसत आहे. पहिल्यांदाच थेट ३ रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ(Petrol and diesel prices hiked by ₹3) करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. आज २३ मे २०२६ रोजी सरकारने दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये ही वाढ केली.

नक्की वाचा: भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय?

पेट्रोल ८७ पैसे तर डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ (Petrol and Diesel Price Hike)

देशात इंधनाचा तुटवडा आहे. इंधनाच्या तुटवड्यासोबतच आता सतत पेट्रोल आणि डिझेलच्या कितमीमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून या काळात मार्ग काढण्याकरिता एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. सोने न खरेदी करण्याचे आवाहन अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आला. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली. माहितीनुसार, पेट्रोलच्या किमती मध्ये ८७ पैशांची वाढ तर डिझेलच्या किमतीमध्ये ९१ पैशांची वाढ करण्यात आली.

अवश्य वाचा: आता वाहनधारकांची खैर नाही! ‘ही’ गोष्ट न केल्यास थेट हजार रुपये दंड, परिवहन मंत्र्यांचा इशारा

अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई (Petrol and Diesel Price Hike)

सरकारने इराण आणि अमेरिका युद्धात कोणत्याही प्रकारची इंधनात भाव वाढ होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून आता तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. या युद्धात महागाईचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत आहे. अनेक गोष्टींच्या दरात सध्या वाढ झाली आहे. त्यामध्येच राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई बघायला मिळते.

होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेची टंचाई असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे, जो मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करतो. दिवसेंदिवस भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे.