Theft : राहुरी : अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील गडधे आखाडा येथे शुक्रवार (ता. २२) पहाटेच्या सुमारास शेजारी-शेजारी असलेल्या दोन घराचे कुलूपे (Locks) तोडून घरात प्रवेश केला. नंतर घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व रोख रक्कमेचा मुद्देमाल चोरुन (Theft) नेल्याची घटना उघडकीस आली.
नक्की वाचा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ‘सारोळा सोमवंशी’ प्रथम, तर ‘कोळगाव’ द्वितीय
कुलूप तोडून घरात प्रवेश
भागवत कोंडीराम कोळसे हे गडधे आखाडा येथे राहत असून त्यांचा मुलगा सटवाजी कोळसे हे त्यांच्या शेजारीच रहावयास आहे. सटवाजी कोळसे हे कामानिमित्त बाहेर गावी गेल्याने त्यांच्या घराला कुलुप लावलेले होते. शुक्रवार (ता. २२) पहाटे तीन वाजेच्या सुमारास भागवत कोळसे व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून घरा समोरील पटांगणात झोपले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भागवत कोळसे व सटवाजी कोळसे या दोघांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. आणि दोन्ही घरातील मिळुन १ तोळा सोन्याचे दागीने व २० हजार रुपए रोख रक्कम, तसेच एक इलेक्ट्रॉनिक मशिन असा मुद्देमाल चोरुन नेला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल (Theft)
भागवत कोळसे यांच्या पत्नी पहाटे झोपेतून उठल्या. तेव्हा त्या घरात गेल्या असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी कोळसे यांनी घराच्या आजूबाजूला पाहणी केली असता घरापासून काही अंतरावर पेटी व काही कपडे पडलेले दिसून आले. चोरट्यांनी पेटीमधील मुद्देमाल चोरून नेला असून, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे



