Pre-monsoon rains : श्रीगोंदा: तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon rais) जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेला आणि उघड्यावर असलेला शेतीमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. वादळी पावसामुळे तालुक्यातील कोळगाव परिसरासह अनेक भागात डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील आढळगाव श्रीगोंदा, कोळगाव या भागांसह इतरही अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
अवश्य वाचा- सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद
शेती कामांचे नियोजन कोलमडले (Pre-monsoon rais)
सध्या अनेक ठिकाणी खरिपाची पूर्वतयारी सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात नेण्याच्या तयारीत आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील पिके आणि साठवून ठेवलेला माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांना एकच धावपळ करावी लागली. या अवकाळी संकटामुळे शेती कामांचे नियोजन कोलमडले असून, मशागतीची कामे खोळंबली आहेत.



