Accused jailed: पाथर्डी: शहरातील गायछाप कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वॉकिंग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन हिसकावून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी मुख्य आरोपीला पाथर्डी पोलिसांनी अटक (Accused jailed) केली आहे. अजय पिराजी पवार (वय २०, रा. माणिकदौंडी चौक, पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी पोलिसांनी धामणगाव घाटात सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी राणी वसंत वारे (वय ३८, रा. नगर रोड, पाथर्डी) या साक्षीदार सुनिता सुनिल ढोले यांच्यासोबत गायछाप कारखाना रोड परिसरात वॉकिंग करत होत्या.
अवश्य वाचा- सिद्धटेक येथील भीमानदी पुलावरील वाहतूक १० दिवसांसाठी बंद
पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Accused jailed)
यावेळी एका मोटारसायकलवरून तिघेजण त्यांच्या पाठीमागून आले. रस्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन बळजबरीने हिसकावून मोटारसायकल वरून पळ काढला होता.या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अजय पवार याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाथर्डी-मढी रोडवरील धामणगाव घाट परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीला पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर सध्या त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, इजाज सय्यद व निलेश गुंड यांच्या पथकाने केली.



