Fadnavis In Shirdi : साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प; अहिल्यानगर डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब बनणार

0
Fadnavis In Shirdi : साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प; अहिल्यानगर डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब बनणार
Fadnavis In Shirdi : साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प; अहिल्यानगर डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब बनणार

Fadnavis In Shirdi : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे जगभरात प्रसिद्ध असलेले एक प्रमुख धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. पण आता भक्तीसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी शक्तीचा नवा प्रकल्प सुरू झाला आहे. शिर्डीच्या एमआयडीसी परिसरात 200 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे नुकतेच भव्य लोकार्पण करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

हेही पहा : बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रक; महाराष्ट्र बोर्डाकडून तारीख जाहीर

भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प

कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा जो संदेश दिला होता, त्याची यशस्वी अंमलबजावणी आज होताना दिसत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात इतकी मोठी प्रगती केली आहे की, आज आपला देश केवळ स्वावलंबी बनला नसून संरक्षण साहित्याचा मोठा निर्यातदार बनला आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली धांदल

वर्षभर पुरेल एवढा साठा (Fadnavis In Shirdi)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या ठिकाणी जे तोफगोळे तयार होणार आहेत, ते खूप महत्त्वाचे काम आहे. वर्षभर या प्रकल्पात उत्पादनाचे काम अखंडपणे सुरू राहील, अशी अजोड तयारी त्यांनी केली आहे. निबे यांनी 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे निर्माण केली आहेत. जर देशावर युद्धाची वेळ आली, तर 360 ते 365 दिवस सलग दारूगोळा पुरवण्याची क्षमता या एकाच प्रकल्पात आहे. यासोबतच शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने गाईड केलेले अत्याधुनिक ड्रोन देखील येथे तयार होत आहेत”.