HSC Marksheet : बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रक; महाराष्ट्र बोर्डाकडून तारीख जाहीर

0
HSC Marksheet : बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रक; महाराष्ट्र बोर्डाकडून तारीख जाहीर
HSC Marksheet : बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रक; महाराष्ट्र बोर्डाकडून तारीख जाहीर

HSC Marksheet : नगर : महाराष्ट्र बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं 2 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचं लक्ष त्यानंतर प्रत्यक्ष गुणपत्रक कधी मिळणार याकडे लागलं होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बारावीचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र कधी मिळणार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

या दिवशी गुणपत्रक मिळणार

विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेचे गुणपत्रक येत्या सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी दुपारी 3.00 वाजल्यानंतर मिळेल, अशी माहिती परीक्षा मंडळाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 25 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नक्की पहा : एमआयडीसी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले

महाविद्यालयांना सूचना (HSC Marksheet)

याच दिवशी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दुपारी 3.00 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.