
Karjat Agricultural Produce Market Committee : कर्जत : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Agricultural Produce Market Committee) पदाधिकारी निवडीत दोन वर्षांनंतर उपसभापती पदाचा शब्द देऊन तो पाळला नसल्याच्या कारणाने शिवसेना उबाठा (Shiv Sena (UBT) गटाचे संचालक बळीराम यादव आणि त्यांच्या समर्थकांनी शनिवारी (ता. २३) विद्यमान उपसभापती अभय पाटील यांच्या दालनास टाळे ठोकत पदाधिकारी नामफलक काढले. या आंदोलनाने (Protest) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
नक्की वाचा : भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल : राजनाथ सिंह
बाजार समितीच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजी
मागील सहा महिन्यापासून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांमध्ये अंतर्गत धुसफूस चालू आहे. बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत शिवसेना उबाठा गटाचे जेष्ठ संचालक बळीराम यादव यांना प्रथम निवडीत दोन वर्षांनंतर आपणांस संधी दिली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यांनतर राम शिंदे गटाकडून अभय पांडुरंग पाटील यांना पहिल्या वेळेस उपसभापती पदावर संधी देण्यात आली होती. दोन वर्षे उलटले तरी अभय पाटील यांनी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाचा राजीनामा न दिल्याने शनिवारी (ता. २३) सकाळी संचालक बळीराम यादव आणि त्यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या कार्यालयात येत जोरदार घोषणाबाजी करीत अभय पाटील यांच्या दालनास टाळे ठोकत काम न करून देण्याचा निर्णय घेतला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बाजार समितीचा कारभारच बंद पाडण्याचा इशारा (Karjat Agricultural Produce Market Committee)
तसेच त्यांच्या दालनास असलेले नामफलक देखील संतप्त कार्यकर्त्यांनी काढले. सदरच्या घटनेने काही काळ कर्जत बाजार समितीच्या आवारात तणावपूर्ण वातावरण बनले होते. मागील सहा महिन्यांपूर्वी देखील संचालकांच्या मासिक बैठकीत याच पदावरून वाद घडला होता. या महिन्याअखेर बाजार समिती पदाधिकारी निवडीत आपल्याला दिलेला शब्द पाळण्यात न आल्यास संपूर्ण बाजार समितीचा कारभारच बंद पाडण्याचा इशारा आक्रमक शिवसेना उबाठा गटाने दिला.


