Diesel and Petrol Shortage : पाथर्डी : तालुक्यातील पेट्रोल पंपांवर (Petrol Pumps) निर्माण झालेल्या डिझेल-पेट्रोल तुटवड्याच्या (Diesel and Petrol Shortage) पार्श्वभूमीवर समस्त खाजगी ॲम्बुलन्स चालक व मालक संघटना (Private Ambulance Drivers and Owners Association) तसेच सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना स्वतंत्र निवेदने दिली. आपत्कालीन वाहनांसाठी पेट्रोल पंपांवर इंधन राखीव ठेवावे तसेच कृत्रिम डिझेल तुटवडा निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली.
नक्की वाचा : भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल : राजनाथ सिंह
खडी क्रेशर मालकांना डिझेल पुरवठा करत असल्याचा आरोप
समस्त खाजगी ॲम्बुलन्स चालक व मालक संघटनेच्या निवेदनात, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड व इतर आपत्कालीन वाहनांसाठी डिझेल व पेट्रोल राखीव ठेवण्याच्या सक्त सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. २० मे रोजी तीसगाव येथील इंडियन ऑईल अधिकृत तिसगाव फ्युएल प्लाझा येथे गंभीर रुग्ण घेऊन गेलेल्या दोन ॲम्बुलन्सना डिझेल उपलब्ध झाले नसल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी दिलेल्या निवेदनात तालुक्यातील काही पेट्रोल पंप चालक कृत्रिम डिझेल तुटवडा निर्माण करून खडी क्रेशर मालकांना मोठ्या प्रमाणात डिझेल पुरवठा करत असल्याचा आरोप केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेती मशागतीच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज (Diesel and Petrol Shortage)
तालुक्यातील १८ खडी क्रेशरना दररोज मोठ्या प्रमाणात डिझेल मिळत असताना शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना मात्र, डिझेल संपले असे फलक लावून परत पाठवले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शेती मशागतीच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज असून प्रशासनाने पेट्रोल पंपांचा साठा नियमित तपासून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली आहे. देविदास हंडाळ, तोफिक मणियार, अक्षय उराडे, रामनाथ आव्हाड, कय्युम मणियार, मनोहर ठोंबरे व कानिफनाथ हंडाळ यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.



