Anna Hajare on CJP : नगर : कॉक्रोच जनता पार्टीवरून देशात दोन उभे गट पडलेले असून, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवला आहे. युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे, असे सांगत अण्णा हजारे यांनी शासनाला सल्ला दिला आहे.
हेही वाचा : ॲम्बुलन्ससाठी राखीव इंधनाची मागणी; तहसीलदार यांना निवेदन
अण्णा हजारे म्हणाले…
अण्णा हजारे म्हणले, “झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की, या पार्टीने झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता? नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारने त्याचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे”.
नक्की पहा : पाथर्डी-धामणगाव रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य;भाविक व नागरिक त्रस्त
…तर पुन्हा आंदोलन (Anna Hajare on CJP)
राज्यात लोकायुक्त कायद्याला जरी संमती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय?, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले.



