Pathardi News : पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे कासारवाडी येथील वृद्धा नदीपात्रामध्ये (Vruddha River) अनधिकृतपणे उभारण्यात आलेले प्रार्थनास्थळ सोमवारी (ता. २५) हटविण्यात आले. प्रशासनाच्या निर्देशानंतर संबंधितांकडूनच जेसीबीच्या (JCB) सहाय्याने हे बांधकाम (Construction) काढून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर येथे रशियन ग्रँडमास्टर पेट्र किरियाकोव्हच्या कोचिंग कॅम्प ला सुरुवात
संबंधितांकडूनच बांधकाम हटविण्यात आल्याचे समोर
माहितीनुसार, जवखेडे कासारवाडी परिसरातील वृद्धा नदीपात्रात काही दिवसांपूर्वी पक्के बांधकाम करून प्रार्थनास्थळ उभारण्यात आले होते. या बांधकामाबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाने संबंधित जागेची पाहणी करून अधिकृत मोजणी केली होती. भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीनंतर सोमवारी (ता. २५) सकाळी प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, संबंधितांकडूनच जेसीबीच्या साहाय्याने वादग्रस्त बांधकाम हटविण्यात आल्याचे समोर आले आहे. यावेळी महसूल, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर भर (Pathardi News)
राज्यात अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे या घटनेतून दिसून आले. राहुरी, श्रीरामपूर, नगर तसेच पाथर्डी तालुक्यातील विविध भागांत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर प्रशासनाने अलीकडेच कारवाई केली आहे. दरम्यान, तालुक्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाने हे प्रकरण संयमाने हाताळत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर भर दिला. या कारवाईमुळे परिसरात शांतता व सलोखा कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.



