Gunfire : वाळू माफियाचा शेतकऱ्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; दाभाडेसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

कुंजीर व त्यांच्या भावांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून काढला पळ

0
Gunfire : वाळू माफियाचा शेतकऱ्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; दाभाडेसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
Gunfire : वाळू माफियाचा शेतकऱ्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; दाभाडेसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Gunfire : श्रीरामपूर : तालुक्याच्या  व वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदी (Godavari River) लगतच्या गावांमध्ये सध्या वाळू तस्करांनी हैदोस माजवला आहे. रामपुर येथील वाळू उपशा विरोधातून घडलेल्या घटना ताज्या असतानाच शनिवारी (ता. २३) रात्री पुन्हा एकदा वाळू तस्करीशी संबंध असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या (Shrirampur Municipal Council) अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांनी गावठी कट्ट्यातून शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्याची (Gunfire) घटना समोर आली आहे. 

नक्की वाचा : जवखेडे कासारवाडी नदीपात्रातील अनधिकृत प्रार्थनास्थळ हटवले

दाभाडे हा निलेश शेंडगे हत्या प्रकरणातील पसार आरोपी

विशेष म्हणजे दाभाडे हा बहुचर्चित निलेश शेंडगे हत्या प्रकरणातील पसार आरोपी आहेत. वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव गंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात घडलेल्या या थरारक घटनेने दोन्ही तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जालिंदर सोपान कुंजीर (वय ४५, रा. बाभुळगाव गंगा, ता. वैजापूर) यांनी विरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी  नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जालिंदर कुंजीर व त्यांच्या भावांना मारहाण (Gunfire)

मळालेल्या माहितीनुसार, जालिंदर सोपान कुंजीर (वय ४५, रा. बाभुळगावगंगा, ता. वैजापूर) हे शनिवारी (ता. २३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोदावरी नदीपात्रात काही व्यक्तींची हालचाल दिसल्याने त्यांनी टॉर्चच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी “तू आमचे लोकेशन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना देतोस” असा आरोप करत त्यांना शिवीगाळ सुरू केली. यानंतर आरोपींनी जालिंदर कुंजीर व त्यांच्या भावांना मारहाण केली. दरम्यान, नगरसेवक अर्जुन दाभाडे यांनी गावठी कट्ट्यातून जिवे मारण्याच्या उद्देशाने आपल्यावर दोन गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून काढला पळ

गोळीबारानंतर कुंजीर व त्यांच्या भावांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी वीरगाव पोलिसांनी अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलीक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी बबन ढेमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात (सर्व रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसने करीत आहेत.