Crime : तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime

0
तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime : नगर : शहरातील बिशप लॉईड कॉलनी परिसरात किरकोळ वादातून एका तरूणावर लोखंडी पाइप व धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी जय रवी खरात (वय २७, रा. बिशप लॉईड कॉलनी, मकासरे क्लब समोर, अहिल्यानगर) यांनी सोमवारी (ता.२५) फिर्याद दिली. सोमवारी पहाटे ही घटना घडली. प्रवीण मधुकर सोनवणे (रा. बिशप लॉईड कॉलनी, मकासरे क्लब समोर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास

फिर्यादीत म्हटले आहे की,

सोमवारी पहाटे १२.४५ वाजण्याच्या सुमारास प्रवीण सोनवणे हा जय खरात यांच्या घरासमोर येऊन आरडाओरड करत होता. त्यावेळी जय खरात यांच्या पत्नीने त्याला आरडाओरड करण्याचे कारण विचारले असता त्याने शिवीगाळ करत तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

धारदार शस्त्राने दोन्ही हातांवर वार (Crime)

घरासमोरील गोंधळ ऐकून जय खरात बाहेर आले असता सोनवणे याने त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी पाइपने मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल फोन फोडून नुकसान केले. तसेच धारदार शस्त्राने दोन्ही हातांवर वार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.