Theft : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास 

७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास

0
Theft : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास
Theft : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास

Theft : पाथर्डी : शहरातील शंकरनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून तब्बल ७० हजार रुपयांची रोकड लंपास (Theft) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : वाळू माफियाचा शेतकऱ्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; दाभाडेसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

फोनद्वारे घराचे दार उघडे असल्याची दिली माहिती

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती केशव दहिफळे (वय ५९, रा. शंकरनगर, अहिल्यानगररोड, पाथर्डी) हे पत्नीसमवेत शनिवार (ता. २४) रात्री त्यांच्या कुत्तरवाडी येथील गावी घराच्या कामानिमित्त गेले होते. तेथे मुक्काम केल्यानंतर रविवार (ता. २५) सकाळी त्यांच्या शेजारी राहणारे जिजा गायकवाड यांनी फोन करून घराचे दार उघडे असल्याची माहिती दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले (Theft)

यानंतर दहिफळे दाम्पत्य तातडीने घरी आले असता घराच्या सेफ्टी दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसून आला. तसेच आतील लाकडी दरवाजाला कडी लावलेली होती. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील ड्रॉवर उघडे असून त्यामधील ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, शनिवार (ता. २४) रात्री साडेआठ ते रविवार (ता. २५) सकाळी दहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.