Kukdi Dam: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वाढत्या उन्हामुळे जमिनीची धूप

0


Kukdi Dam: कर्जत: सोमवारी (ता.२५) सायंकाळी ६ वाजता येडगाव धरणाच्या कुकडी डावा कालव्यातून (Kukdi Dam) ५०० क्यूसेक वेगाने उन्हाळी आवर्तन विसर्ग सुरू झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र कर्जत-जामखेडच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या पाठपुराव्यास यश आले या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोणाचा शब्दास यश आले याचे उत्तर मिळाले नाही. सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार दोन्ही समर्थकांनी आपलाच नेता पॉवरफुल आशयाचे पोस्ट प्रसारित केल्या.

अवश्य वाचा- जवखेडे कासारवाडी नदीपात्रातील अनधिकृत प्रार्थनास्थळ हटवले

वाढत्या उन्हामुळे जमिनीची धूप (Kukdi Dam)

यावर्षी उन्हाने तब्बल चाळीशी पार केली. वाढत्या उन्हामुळे जमिनीची धूप यासह बहुतांश ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे जलस्रोतांनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पीक, फळबागा, पशुधनासाठी पाण्याची गरज होती. तसेच कर्जत तालुक्यातील जवळपास ९ गावांच्या ६४ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी-पुरवठा सुरू असल्याने पाणीटंचाईच्या भीषण समस्या निर्माण झाल्याने कुकडी आवर्तनाची नितांत आवश्यकता होती. सोमवार, दि २५ रोजी सायंकाळी ६ वाजता येडगाव धरणाच्या कुकडी डावा कालव्यातून ५०० क्यूसेक वेगाने उन्हाळी आवर्तन विसर्ग सुरू झाला आहे. या आवर्तनाने रब्बी पिकांचा, पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Geographic Reference

ऐन टंचाईच्या काळात सुरू झालेल्या या आवर्तनाने शेतकरी बांधवांसह टंचाई सदृश्य नागरिकांना निश्चित फायदा मिळणार आहे. कुकडी आवर्तन सुटल्याचे जाहीर होताच कर्जत-जामखेड मतदारसंघात सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आपलाच नेता पॉवरफुल म्हणत अखेर आमच्या पाठपुराव्यास यश आले या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या.