FDA : अन्न प्रशासनाचा बेकरीवर छापा; मुद्देमाल जप्त
FDA : नगर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संगमनेर तालुक्यातील बोटा येथील गोल्डन बेकरीवर सोमवारी सकाळी छापा टाकला. या कारवाईत बेकरीमधील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन उघडकीस आले असून, प्रशासनाने तब्बल ३२,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नक्की वाचा : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बोटा येथील गोल्डन बेकरीमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रारही स्थानिक ग्रामस्थांनी अन्न आणि औषध प्रशासनाला केली होती. या व्हिडीओमध्ये बेकरीत घाणीचे साम्राज्य आणि माशांचा प्रचंड सुळसुळाट असल्याचे दिसून आले होते. या व्हिडीओमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संबंधित व्हायरल व्हिडीओ अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाला असता अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सोपान इंगळे आणि अन्न औष अधिकारी प्रदीप पवार यांच्या पथकान तातडीने सोमवारी या बेकरीवर छाप टाकला. प्रत्यक्ष पाहणीत बेकरीमध् अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम २६, २७ आणि २३ चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पथकाल आढळून आले.
हेही पहा : पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोंधळात एकाचा मृत्यू
आरोग्याशी खेळ (FDA)
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांन कायद्याच्या कलम ३८ अन्व मिळालेल्या अधिकारांचा वापर करत घटनास्थळावरून पंच आणि साक्षीदार यांच्या उपस्थितीत फ्रुटी टोस्ट (गोल्डन जिरा बटर (गोल्डन), जिरा खार (गोल्डन) असा ३२ हजार २८० रुपयांच मुद्देमाल जप्त करून सीलबंद केल नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.



