MLA Dr. Kiran Lahamte : अकोलेत ‘आदिम सांस्कृतिक ग्रंथालया’चे उद्घाटन

MLA Dr. Kiran Lahamte : अकोलेत ‘आदिम सांस्कृतिक ग्रंथालया’चे उद्घाटन

0
MLA Dr. Kiran Lahamte : अकोलेत ‘आदिम सांस्कृतिक ग्रंथालया’चे उद्घाटन
MLA Dr. Kiran Lahamte : अकोलेत ‘आदिम सांस्कृतिक ग्रंथालया’चे उद्घाटन

MLA Dr. Kiran Lahamte : अकोले : मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या (Digital Entertainment) वाढत्या प्रभावाच्या काळात आदिवासी (Tribals) समाजातील तरुण शिक्षक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाचन, चिंतन आणि सांस्कृतिक जतन संवर्धनाची चळवळ उभी केली आहे. सह्याद्री कोळी महादेव सांदण परिवार प्रतिष्ठानच्या कार्यालयासह ‘आदिम सांस्कृतिक ग्रंथालय’चे (Indigenous Cultural Library) रविवारी (दि.24) अकोल्यात उद्घाटन झाले. हे ग्रंथालय आदिवासी समाजाच्या इतिहास, लोकपरंपरा, भाषा, कला, निसर्गपूरक जीवनशैली आणि पूर्वजांच्या ज्ञानपरंपरेचे जतन व संशोधन करणारे केंद्र म्हणून हे विकसित व्हावे, अशी अपेक्षा विविध वक्त्यांनी बोलून दाखवली.

नक्की वाचा : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास

महापुरुषांच्या चरित्रांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन करणार

प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) व आदिम सांस्कृतिक ग्रंथालयाचे उद्घाटन इतिहास संशोधक प्रा. डॉ. विलास गवारी यांच्या हस्ते पार पडले. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. नितीन तळपाडे, लेखक पी. सी. झांबाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व लेखक राजू ठोकळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी आदिवासी समाजातील पराक्रमी व्यक्तिमत्व राघोजी भांगरे, रामा किरवा आणि लक्ष्मण खाडे यांच्यासह इतरांच्या चरित्रांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन वाचनालयाच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार (MLA Dr. Kiran Lahamte)

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय गोडे व त्यांच्या सहकार्‍यांनी आदिम सांस्कृतिक ग्रंथालय सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सोमनाथ कातडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विकास साबळे यांनी केले. यशवंत पारधी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणार्‍या मनस्वी बांडे व आई वैशाली बांडे या मायलेकींचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर भांगरे, बबन बांबेरे, प्रशांत गवारी, विठ्ठल बांगर, कैलास सारोक्ते, सीताराम बेंडकोळी, सीताराम बांडे, लक्ष्मण घोटकर, प्रवीण भांगरे, अनिल देशमुख, विशाल कुंदे, गणेश शिंदे, रोहिदास डगळे, अ‍ॅड. धनंजय झडे, प्रवीण खाडे, विजेंद्र साबळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.