LCB : जिल्ह्यात १० अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB

0
LCB : जिल्ह्यात १० अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
LCB : जिल्ह्यात १० अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांसह (Illegal Liquor Sales) जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकून 76 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा, बेलवंडी, राहुरी, लोणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

नक्की वाचा : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास

अवैध दारू विक्रीची खात्रीशीर माहिती

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा, बेलवंडी, राहुरी व लोणी परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

76 हजार 470 रु. मुद्देमाल हस्तगत

त्यानुसार पथकाने सापळा रचून विविध ठिकाणी छापा टाकून 76 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.