Crime : नगर : राहुरी शहरात अवैधरीत्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्या मावा माफियांविरुद्ध तीन ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करुन, तब्बल ३ लाख ४९ हजार ५०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : सोनईत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
विशेष पथकाचा छापा
युवकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यवसायिकांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारल्याचे या कारवाईतून दिसत आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह राहुरी शहरातील विविध भागात छापेमारी मोहीम राबवली. या मोहिमेत अवैधरित्या मावा तयार करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.
नक्की पहा : ईदनिमित्त मुस्लिम समाजाकडून गोसेवा
राहुरी पोलिसात गुन्हा (Crime)
या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३ लाख ४९ हजार ५०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



