Gavthi Katta : पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील पाचजण ताब्यात; ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त

Gavthi Katta : पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील पाचजण ताब्यात; ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त

0
Gavthi Katta : पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील पाचजण ताब्यात; ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त
Gavthi Katta : पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील पाचजण ताब्यात; ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त

Gavthi Katta : नगर : पुणे शहरातील कुख्यात आंदेकर टोळीशी (Andekar Gang) संबंधित कोयता गँग (Koyta Gang) दरोड्याच्या तयारीत असताना अहिल्यानगर शहराजवळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पकडली. पाच संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत चार गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे तसेच मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ७६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे गजाआड; एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण

जेरबंद केलेल्या पाच जणांची नावे

मुस्ताक इक्राहीम शेख (वय २२), विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहंदळे (वय २६), समर्थ बाबासाहेब माडळकर (वय १९), समर्थ राजेंद्र दुधभाते (वय १८, सर्व रा. कोंढवा, पुणे) व आकाश संजय पवार (रा. ब्रम्हतळे, रा. भिंगार, अहिल्यानगर) अशी जेरबंद केलेल्या पाच जणांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना मिलिट्री इंटेलिजन्स, साउथ कमांड, अहिल्यानगर यांच्याकडून माहिती मिळाली होती. मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ, बुऱ्हानगर रस्तावर काही इसम अग्नीशस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे इनपुट मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. यानंतर विशेष पथक रवाना करण्यात आले. पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित पाच इसम आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यातील एक इसम दुचाकीवरून पसार झाला, तर उर्वरित चौघांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तीन गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे जप्त (Gavthi Katta)

चौघांकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, कोयता, चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. पुढील तपासादरम्यान पसार संशयित आरोपी आकाश पवार यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, पकडलेले संशयित आरोपी हे पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील असून त्यांच्यावर यापूर्वी पुणे शहर परिसरात खून, खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले.