Vivek Kolhe : राहाता : नुकतीच विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांची विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल गणेश परिसराच्या वतीनेनागरी सत्कार राहाता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिर (Veerabhadra Maharaj Temple) समोरील मैदानात करण्यात आला.
नक्की वाचा : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणामुळे पांगरमलची आठवण ताजी
कोल्हे म्हणाले की
यावेळी सत्काराला उत्तरे देताना आमदार कोल्हे म्हणाले की मी नेहमी माझी रेष मोठी करण्याचा प्रयत्न करतो, कारण मला सकारात्मक राजकारण करण्यासस व लोकांचे हित साधण्यात आनंद होतो त्यासाठी मी इतरांची रेष न खोडता आपली रेष कशी मोठी होईल असे सकारात्मक राजकारण करतो माझे आजोबा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आम्हाला हीच शिकवून दिलेली त्यांच्या आशीर्वादाने माझी वाटचाल भविष्यात राहणार आहे. आमदार कोल्हेंचा सत्कारासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सहकाराच्या भूमीत गणेश कारखान्याची अडवणूक (Vivek Kolhe)
यावेळी आमदार कोल्हे म्हणाले की कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता गणेश कारखाना चांगला चालला पाहिजे गणेश परिसराची कामधेनू आहे हीच भूमिका घेऊन आपली वाटचाल सुरू आहे. सहकारात निवडणुका संपल्या की राजकारण संपत असते परंतु दुर्दैवाने गणेशच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही सहकाराच्या भूमीत गणेशची अडवणूक चालू आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी केले. अडचण निर्माण करणाऱ्या सांगितले की मै जब घायल होता हू तो ज्यादा घातक होता हू, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली हॉटलाइन आहे त्यामुळे आपली कामे आडणार नाहीत.
आर्थिक त्रास देण्याचे राजकारण करू नका
गणेश कारखाना ताब्यात आला तेव्हा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून मार्ग काढून आपण कारखाना सुरळीत करण्यासाठी काम केले. अनेक अडथळे आणण्याचा गणेश विरोधक प्रयत्न करत आहेत त्यांना विनंती असेल आपण लोकशाही मागनि सभासदांना निवडणुकीत कौल मागा मात्र असे आर्थिक त्रास देण्याचे राजकारण करू नका. या कामधेनुला विनाकारण त्रास दिला देऊ नका, असे कोल्हे यांनी सांगितले. प्रभावती घोगरे, सुहास वहाडणे, ॲड.नारायणराव कार्ले, डॉ. राजेंद्र पिपाडा, विराट पुरोहित, रणजित बोठे आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
यांची उपस्थिती
धनंजय गाडेकर यांनी कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गणेशचे माजी संचालक रामचंद्र बोठे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे, ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, ॲड.शिवाजी कोते, शिवाजी तात्या लहारे, भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, विराट पुरोहित, शिवसेना (उबाठा) चे सोमनाथ गोरे, शिवाजीराव गोंदकर, ॲड.नारायणराव कार्ले, भाऊसाहेब चौधरी, सचिन तांबे, सुरेश थोरात, नगरसेवक शशिकांत लोळगे, सचिन चौघुले, राजेंद्र अग्रवाल, आप्पासाहेब दंडवते, गणेश सोमवंशी, विजय मोगले, भाऊसाहेब थेटे, संजय सोमवंशी, वसंतराव चोळके, चंद्रभान गुंजाळ, विलासराव टिळेकर, वसंतराव गायकवाड, उत्तमराव घोरपडे, गणपतराव धरम, सुरेशराव गमे, नानासाहेब शेळके, संजय शेळके, संजयराव सरोदे, चंद्रभान धनवटे, शंकरराव जेजुरकर, सुरेश थोरात, अनिल बोठे, सिमोन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.



