Local Crime Branch : नगर : राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे वृद्ध आजोबांवर गोळीबार (Gunfire) करणारा संशयित आरोपी (Suspect) मुळा डॅम परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून दोन लाख चार हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रविण बाबासाहेब कोहकडे (वय २२, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार
राहुरी तालुक्यात (ता.२९) रोजी सकाळी फिर्यादी दगडु गंगाराम कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी जि. अहिल्यानगर) याचेवर आरोपी प्रविण बाबासाहेब कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) याने गुन्हा दाखल केल्याचे कारणावरुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गावठी कट्टयातुन गोळीबार करुन पळुन गेला होता. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Local Crime Branch)
या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा बारागाव नांदूर ते मुळा डॅम परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा गावठी कट्टा, चार जिवंत काडतूसे असा एकुण दोन लाख चार हजार ४०० रुपयांचा मुद्यमाल हस्तगत केला.



