
Pathardi Municipal Council : पाथर्डी : नगरपरिषदेचा (Pathardi Municipal Council) ४१ वा स्थापना दिन शनिवार (ता. ३०) नगरपरिषद परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ३० मे १९८५ रोजी स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त (Foundation Day) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य शिबिर (Health Camp), मान्यवरांचा सत्कार तसेच नगरपरिषदेत सेवा बजावून अन्यत्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. केक कापून वर्धापन दिनाचा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
नक्की वाचा : सस्पेन्स संपला! भाजप प्रवेशाने प्राजक्त तनपुरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा
नगरपरिषदेच्या इमारतीला आकर्षक सजावट
वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, माजी नगरसेवक राधाकिसन सबलस, नगरपरिषदेत सेवा बजावून अन्यत्र कार्यरत असलेले सोमनाथ गर्जे, दत्तात्रय टेके, सुरेश शेटे तसेच स्वच्छता कर्मचारी कळू पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या इमारतीला विद्युत रोषणाई, फुगे व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर रेखीव रांगोळी काढण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांना मान-सुपारी व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष आव्हाड म्हणाले, स्वर्गीय राजीव राजळे यांनी शहर विकासाचे दूरदृष्टीपूर्ण स्वप्न पाहिले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शहराचे मोठे नुकसान झाले. आज ते असते तर पाथर्डी शहराचा विकास अधिक वेगाने झाला असता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शासनाच्या माध्यमांतून भरीव निधी उपलब्ध (Pathardi Municipal Council)
आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाची कामे सुरू असून शासनाच्या विविध माध्यमांतून भरीव निधी उपलब्ध होत आहे.शहराचा विकास आपल्या कुटुंबाप्रमाणे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.यावेळी कोकाटे व घोडके म्हणाले की,पाथर्डी नगरपरिषदेचा स्थापना दिन हा शहराच्या विकास प्रवासाचा गौरवशाली टप्पा आहे. नागरिकांच्या सहकार्याने शहर अधिक स्वच्छ, सुंदर व सुविधायुक्त करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील. विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढवून पाथर्डीला आदर्श शहर बनविण्याचा आमचा आमदार मोनिका काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प आहे.
१९८५ ते १९९० या कालावधीत प्रशासकांकडे होता कारभार
मुख्याधिकारी लांडगे म्हणाले की,नगरपरिषद स्थापन होण्यापूर्वी पाथर्डी, शिरसाटवाडी, तनपुरवाडी व हंडाळवाडी मिळून ग्रामपंचायत अस्तित्वात होती. १९८५ ते १९९० या कालावधीत प्रशासकांकडे कारभार होता. त्यानंतर १९९१ मध्ये प्रथम नगराध्यक्ष म्हणून सुभाष घोडके यांनी कामकाजाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात विकासकामांचा पाया रचला गेला. त्यानंतर नगरपरिषदेने टप्प्याटप्प्याने प्रगती करत विकासाचा वेग कायम ठेवला आहे. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी प्रास्ताविक, अनिल कोळगे यांनी सूत्रसंचालन तर किशोर पारखे यांनी आभार मानले.
नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित
यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, बंडूशेठ बोरुडे, सुभाष बोरुडे, संजय देशमुख, डॉ. जगदीश मुने, प्रतीक नांगरे, देवा पवार, वंदना टेके, किरण खेडकर, मनीषा उदमले, ज्योती पवार,सविता भापकर, मंगल सोनटक्के,रेखा हंडाळ, मुख्याधिकारी संतोष लांडगे.आजिनाथ मोरे, बाळू सोनटक्के,बबन सबलस, संदिप पवार, किशोर परदेशी, कार्यालयीन प्रमुख विशाल डहाळे, सोमनाथ नारळकर, कृष्णा देवढे, अशोक डोमकावळे, अंबादास साठे, संजय खोर्दे, किशोर पारखे, शुभम काळे, विजय जाधव, दशरथ हंडाळ, नंदकुमार गोला, अरुण सोनटक्के,पंकज पगारेयांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


